तिच्याकडे पहावेसे वाटते, हसली की मन कसे बहरुन जातेच
नाहीतरी वाळवंटात भटक्याला कधीतरी मृगजळ हे दिसतेच
-------
जिवनाच्या परीक्षेत नापास झालेलो..प्रेम या विषयाचे पुस्तक मी फाडून टाकले होते..
आता पाने गोळा करतो आहे..कारण पुन्हा एकदा नव्याने परीक्षेला बसावेसे वाटते आहे
-------
वाटले नव्हते कधी ती मनाच्या इतक्या जवळ येइल
ओघळणाऱ्या अश्रूंच्या वाटेला नवा मार्ग दाखवील..
---------
कधी कोणी ह्या धावणाऱ्या वेड्या मनाला समजेल का..??
नेहमीच हसतो मी..कधी हास्यामागील अश्रू कोणी पाहिल का..??
---------
वेडी आहे ती मी काही बोललो की अलगद हसते
नशीब ह्या मनातल्या वेदनांना वाचा नसते
---------
विचारते कशा सुचतात तुला ह्या कविता..
हसते..मन बोलते..तूच तर कोरल्यास ह्या शब्दांच्या पायवाटा..
---------
मी एक पतंग..उंच भरारी..स्वप्न त्या मोकळ्या आकाशाचे
का डोर सोडलीस बरे तू..आता जीवन हे अधांतरीचे....
---------
स्वतःसाठी वेळ काढून जगणे कधी जमलेच नाही
ज्याच्यासाठी वेळ काढला त्यांनाच साथ देता आली नाही
---------
Thursday, April 24, 2008
Subscribe to:
Posts (Atom)