Tuesday, November 27, 2007

प्रेम....

तुला पाहता काय झाले मनाला
मी हरवून गेलो, विसरलो जगाला..
तुझे दूर जाणे, हे माझ्याशी रुसणे
करी हाल-बेहाल माझ्या मनाला..
तुझा गार स्पर्श, मी झालो बेहोश
तुलाच पाहू की सावरू स्वतःला..
तु शब्दातच येते, तु स्वप्नातच येते
कधी थेट देशील, या वेड्या जीवाला....

- प्रेम

- ही माझी कविता नसून माझा ऑफ़िसमधील अतिशय जिवलग मित्र "प्रेम" ह्याची आहे..अतिशय सुंदर आणि मनमिळावू व्यक्तिमत्व..कधी या नक्कीच भेटवेण..!!